राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टवर नेटिझन्सकडून टीका केली जात आहे. गणेशोत्सवानिमित्त ठाकरे आणि पवार कुटुंबीय एकत्र आले आणि त्यांचा फोटो शेअर करत सुप्रिया सुळे यांनी 'My CKP Moment - Patankar- Sardesai - Thackeray - Sule!' असे लिहिले आहे.