पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजनावर सवाल उपस्थित करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. कार्यक्रमासाठी 150 सीसीटीव्ही कॅमेरे आणि 300 बाऊंसर्सची फौज तैनात असेल. किशोरवयीन मुलामुलींना मद्यपान करू देणार नाही, अशी ग्वाही आयोजक आणि राज्य सरकारने हायकोर्टात दिली.
सनबर्न फेस्टिव्हल'ला परवानगी द्यायची असेल तर आयोजकांकडून सर्व अटींचे आणि नियमांचे पालन होत असल्याची खातरजमा करूनच राज्य सरकारने द्यावी. मात्र कोणत्याही अटी-नियमाचे उल्लंघन झाले तर हायकोर्ट ते अत्यंत गांभीर्याने घेईल आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणून विचारात घेतले जाईल. शिवाय त्यामुळे आयोजकांना पुढच्या वर्षी असा कार्यक्रम करणं अवघड होईल, असा आदेश कोर्टाने दिला. न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली.
सनबर्न हा एक आंतरराष्ट्रीय संगीताचा कार्यक्रम आहे. जिथे देशविदेशातील कलाकार येऊन आपली कला सादर करतात.