सोलापूर जिल्ह्यातील पेट्रोल पंप, बँक, वाईन शॉप, मॉल्स शासकीय कार्यालयांमध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच प्रवेश मिळतं आहे. याची काटेकोर अंमलबजावणी न करणाऱ्या विरोधात सोलापूर महापालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे.
लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच सेवा देण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेले आहेत. आत्तापर्यंत महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांकडून 04 हॉटेल,10 वाईन शॉप्स,02 पेट्रोल पंपावर कारवाई करण्यात आलेली आहे.