दारूबंदीच्या निर्णयावरून राजकारण तापले

शनिवार, 29 जानेवारी 2022 (18:04 IST)
महाविकास आघाडी सरकारने किराणा दुकाने, सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला असला तरी मद्यप्रेमींचा त्याला प्रतिसाद मिळण्याची शक्यता दिसून येत नाही. गेल्या नऊ महिन्यांत जिल्ह्यात ४३ लाख लिटर विदेशी मद्य, ३१ लाख लिटर बिअर, १ कोटी सहा लाख लिटर देशी दारूची विक्री झाली. त्यातुलनेत वाईनची केवळ ९३ हजार लिटर विक्री झाल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
 
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यातील किराणा दुकाने, सुपरमार्केटचे उद्घाटन केलेमॉलमध्ये दारूविक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीका केली. अशा काव्यात्मक शब्दात रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारच्या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. ठाकरे सरकारच्या निर्णयाला भाजपचा तीव्र विरोध आहे. 
 
वाईन निर्णयावर राजकारण तापले जे आजपर्यंत कधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भोगावे लागले नाही. ते महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भोगावे लागले. गावच्या गाव अंधारात लोटली गेली. ऐन कापणीच्या हंगामात वीज तोडली गेली. त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला.
 
“जर खरोखरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल तुम्ही हे धोरण राबवत असाल तर तुम्ही महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वाइनलाच विक्रीची परवानगी असणार आहे आणि परदेशात झालेल्या बैठकीतील कंपन्यांना नाही हे तुम्ही नमूद करणार का? टक्केवारीसाठी वाइन ही दारू नव्हे असे संशोधन करणाऱ्यांचा मी निषेध करतो असे,” गोपीचंद पडळकर म्हणाले.  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती