आता यापुढे फार काही होणार नाही, अजित पवार यांचा एसटी कर्मचार्याना इशारा

शनिवार, 29 जानेवारी 2022 (15:48 IST)
राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून वेळोवेळी आवाहन करुनही एसटी काही कर्मचारी संपावर ठाम आहेत. जे कर्मचारी सेवेवर हजर झाले नाहीत त्यांना एसटी महामंडळाकडून नोटीसही पाठविण्यात आली. तर काहींना निलंबित केले. काहींना बडतर्फ करण्यात आलेत. मात्र, अद्याप काही कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. आता यापुढे फार काही होणार नाही, असे अजित पवार म्हणाले.  
 
एसटी संपाबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांनी शेवटचे आवाहन केलेले आहे.आता यापुढे फार काही होणार नाही. कर्मचाऱ्यांनी टोकाची भूमिका न घेता विद्यार्थी आणि जनतेचा विचार करावा.  त्यांनी आपला संप मागे घ्यावा, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती