अट्टल दारूडा कोंबडा

शनिवार, 4 जून 2022 (10:53 IST)
भंडारा शहरानजीक असलेल्या पिंपरी पुनर्वसन गावातील रहिवासी भाऊ कातोरे हे शेतकरी आहेत. भाऊ कातोरे यांना कुक्कुटपालन करण्याचा छंद आहे. त्यामुळे त्यांच्याकडे विविध प्रजातीचे कोंबडे आहेत. यामधील एका कोंबड्याला दारुचे व्यसन जडले आहे. दारु घेतल्याशिवाय कोंबड्याच्या घशात अन्न-पाणीही जात नाही. यामागील कारणही विशेष आहे.
 मागील वर्षी कोंबड़ामध्ये 'मरी' रोग आला होता. भाऊ कातोरे यांच्या कोंबडयाला मरी रोग जडल्याने कोंबडयाने खाणे-पिणे सोडले होते. कोणीतरी सांगितले म्हणून मरी रोगावर उपाय म्हणून त्यांनी काही महिने मोहफूलाची देशी दारू कोंबड्याला पाजली. मात्र, मोहफुलाची दारू मिळेनासी झाल्यावर त्यांनी विदेशीचा उतारा देणे सुरु केले. सततच्या दारू सेवनाने त्यांच्या कोंबडयाला दारुचे व्यसन जडले असून दारू पिल्याशिवाय कोंबडा पाणी प्यायलाही तयार होत नाही. आता निर्व्यसनी मालकही कोंबडयाला वाचविण्यासाठी त्यांचे व्यसन डोक्यावर घेऊन आले. 
 या कोबडयांला रोज 45 मिलीचा पॅक लागत असून त्याच्याशिवाय अन्न-पाणीही कोंबडा घेत नाही. आता दर महिन्याला मालकाला 2 हजार रूपयांचा फटका बसत असून दारू सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी दारू लपून आणण्याची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे चिंतेत पडलेल्या मालकाने कोंबडयाचे व्यसन सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु केले असून पशुवैद्यकिय दवाखान्यात पायपीट सुरु केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती