गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरात भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. दिवसभरात आठ जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. यात सहा जण हे जळगाव शहरातील असून एक धरणगाव येथील तर एक ११ वर्षीय मुलगी भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील आहे. या सर्व रुग्णांवर जीएमसीत प्राथमिक उपचार करण्यात आले असून गंभीर रुग्णांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात व रुग्णालयात रेफर करण्यात आले.
मात्र या भटक्या कुत्र्यांवर प्रशासन कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही. ही कुत्री विशेषत: लहान मुलांना लक्ष्य करतात आणि चावा घेतात. काल एकाच दिवसात आठ जणांना या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. दरम्यान प्रशासनाने कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेता, लवकरात लवकर खबरदारीचे पाऊल उचलावे अशी मागणी नागरिक करत आहेत.