Maharashtra News: वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनवर दगडफेकीच्या घटना थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याची ताजी घटना महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात समोर आली आहे. ही घटना जेऊर रेल्वे स्थानकाजवळ घडली, त्यामुळे रेल्वेच्या सी-11 कोचची काच फुटली. पण , या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. रेल्वे आणि स्थानिक प्रशासन या प्रकरणाचा तपास करत आहे.
तसेच छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यात वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी सुरू असताना दगडफेकीची आणखी एक घटना घडली. त्या घटनेतही अनेक डब्यांच्या काचा फुटल्या, याप्रकरणी रेल्वे संरक्षण दलाने पाच आरोपींना अटक केली होती.