मनसेला निवडणूक आयोगाची नोटीस

गुरूवार, 13 फेब्रुवारी 2020 (12:15 IST)
झेंड्यावर राजमुद्रेचा वापर केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राज्य निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. संभाजी ब्रिगेड आणि मराठा महासंघाच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने कारवाईचा बडगा उगारला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राज्य निवडणूक आयोगाचं पत्र मिळालं आहे. मनसेच्या भगव्या रंगाच्या नव्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर केल्यामुळे तक्रारी दाखल झाल्या होत्या. मनसेने तक्रारीवर योग्य ते उत्तर देण्यास आयोगाने सांगितलं आहे.
 
 मनसेच्या महाअधिवेशनात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्या झेंड्याचं अनावरण केलं होतं. मनसेचा नवा ध्वज भगव्या रंगाचा असून त्यावर मध्यभागी राजमुद्रा आहे. महाअधिवेशनाच्या सुरुवातीलाच मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण करुन राज ठाकरेंनी पक्ष कात टाकत असल्याचे संकेत दिले.
 
‘आपले दोन झेंडे आहेत. एक राजमुद्रा असलेला आणि तसाच दुसरा निशाणीचा झेंडा आहे. निवडणुकीच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. राजमुद्रेचा मान राखला गेलाच पाहिजे. कुठेही गोंधळ होता कामा नये’ असं राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं होतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती