सह्याद्री अतिथीगृहावर कोरोना आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक सुरु झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व मंत्री या बैठकीला उपस्थित आहेत. पूरग्रस्तांसाठी मदत आणि कोरोना निर्बंधांबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हॉटेल, रेस्टॉरंट्स यांना वेळ वाढवून देणे, चित्रपटगृह, नाट्यगृह सुरु करणे, नियमांसह मॉल्स सुरु करणे, यासह राज्यातील कोरोना निर्बंधात शिथिलता देण्याबाबत या बैठकीत चर्चेची शक्यात व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर 11 जिल्ह्यातील चिंताजनक स्थितीवरही कॅबिनेट बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर पूरग्रस्त भागाचा आढावा, पंचनामे किती झाले, त्यानुसार पॅकेजमध्ये बदलाची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसंच मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही चर्चा होऊ शकते. शाळांची फी 15 टक्क्यांनी कमी करण्याचा प्रस्ताव मागील मंत्रिमंडळ बैठक आला होता. त्यावरही या बैठकीत चर्चेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
>> 3 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीचे कार्यवृत्त कायम करणे
>> राज्यातील पीक-पाणी परिस्थितीचा आढावा
>> कोविड 19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा आणि सादरीकरण
>> नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/ मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रीत) या संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणण्याबाबत