SSC Result 2021 : दहावीच्या निकालाची वेबसाईट क्रॅश

शुक्रवार, 16 जुलै 2021 (14:09 IST)
कोरोनामुळे यंदा दहावीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या.आज 1 वाजता कोरोनामुळे परीक्षा न झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार होता.परंतु या निकालाची वेबसाईट क्रश झाल्यामुळे विद्यार्थ्यांना निकाल बघता येत नाही.त्यामुळे विध्र्यार्थीं निराश झाले आहे.
 
यंदा दहावीच्या परीक्षेला एकूण 16 लाख विद्यार्थी बसले होते.परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परीक्षा स्थगित करण्यात आल्या.
 
हा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार केला आहे.यंदाच्या वर्षी दहावीत तब्बल 99.95 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
 
विद्यार्थी http://result.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर  निकाल बघू शकतात.या संदर्भात सविस्तर परिपत्रक राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा ने जाहीर केले आहे. 
 
यंदाच्या वर्षी परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे गुण या संकेत स्थळावर बघता येतील तसेच विद्यार्थी त्यांच्या निकालाची प्रिंट देखील काढू शकतील.सर्व विद्यार्थ्यांना राज्य शासनाने दिलेल्या निकषानुसार दिलेले गुण बघण्याची उत्सुकता आहे.ते आपले निकाल http://result.mh-ssc.ac.in या संकेत स्थळावर बघू शकतात.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती