मग ते बाहेर कसे ?, ओवैसी यांचा थेटअजित पवारांवर निशाणा

शनिवार, 26 फेब्रुवारी 2022 (21:19 IST)
एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ओवैसी सध्या उत्तर प्रदेशमध्ये पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. त्यांच्या प्रचारसभेमध्ये शनिवारी बोलताना ओवैसींनी समाजवादी पक्षासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील निशाणा साधला. “आजम जेलमध्ये असताना अखिलेश यादव बाहेर कसे आहेत हे सांगा. सपावाल्यांनो, तुम्ही माझा सामना करू शकणार नाहीत”,असं ते म्हणाले. मात्र, यावेळी त्यांनी नवाब मलिक यांच्या अटकेवर देखील निशाणा साधला.
 
“महाराष्ट्रात नवाब मलिक जेलमध्ये आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्याविरोधात जलसिंचन घोटाळ्याचा आरोप आहे. ते बाहेर आहेत आणि नवाब मलिक जेलमध्ये आहेत. काय होतंय हे?”असा सवाल ओवैसी यांनी केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती