ज्येष्ठ संत श्रीधरस्वामी महाराज पंचगव्हाणकर यांचे देहावसान

मंगळवार, 16 मे 2017 (09:44 IST)

अकोल्यातील वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ संत श्रीधरस्वामी महाराज पंचगव्हाणकर (८६) यांचे देहावसान झाले आहे. अकोला जिल्ह्यातील पंचगव्हाण येथील आप्पास्वामी मठाचे ते मठाधिपती होते. संस्कृतसह, इंग्रजी, हिंदी, मराठी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या श्रीधरस्वामी महाराजांनी देशभरात भागवत धर्माच्या प्रसारासाठी काम केलं. 2000 साली न्यूयॉर्कमध्ये झालेल्या जागतिक धर्मपरिषदेत त्यांनी देशाचं नेतृत्व केलं. समाजाला विज्ञानवादी दृष्टीकोनाची शिकवण देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केलं. पंचगव्हाण येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक असलेल्या नेकनामबाबा दर्ग्याच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी प्रयत्न केले. श्रीधरस्वामींनी आयुष्यभर केलेल्या सामाजिक कार्यासाठी महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेनं 2014 मध्ये ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित केलं होतं.

वेबदुनिया वर वाचा