MUMBAI: आता एसी लोकलमध्येही करता येईल शॉपिंग

सोमवार, 20 जानेवारी 2020 (13:13 IST)
आता पहिल्यांदाच उपनगरी लोकलमध्ये शॉपिंग ऑन व्हील्स योजना सुरु करण्यात येत असून पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट-विरार या एसी लोकलमध्ये प्रवाशांना लवकरच खरेदी करता येणार आहे. यात आता कॉस्मेटिक्स, आरोग्याशी निगडित प्रॉडक्ट्स, इलेक्ट्रॉनिक अॅसेसरीज, टॉयज, स्टेशनरी, खाद्य पदार्थ आणि अनेक अशा प्रकाराच्या वस्तू MRP वर खरेदी करता येतील.
 
सूत्रांप्रमाणे पश्चिम रेल्वेनं विक्रेत्यांच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. हे विक्रेते एसी लोकलमध्ये ट्रॉली घेऊन फिरणार आहेत. ट्रॉली तीन फूट उंच आणि एक फूट रुंद असेल. एकूण चार विक्रेते लोकलमध्ये दोन ट्रॉली घेऊन फिरणार आहेत. या विक्रेत्यांना गणवेश दिला जाणार आहे आणि त्यांच्याकडे ओळखपत्रेही असणार आहेत. याशिवाय त्यांच्याकडे विक्रीसाठी असलेल्या वस्तूंची माहिती देणारे पत्रकही असेल. एसी लोकलमध्ये सकाळी आठ वाजेपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत वस्तू विकल्या जाणार आहेत.
 
गेल्या वर्षी पश्चिम रेल्वेनं लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये 'शॉपिंग ऑन व्हील्स' ही योजना सुरू केली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती