बीड येथे टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. अल्पवयीन मुलीने गुरुवारी (दि.२५) शाळा सुटल्यानंतर चार वाजता ती मामाच्या शेतातील घरी आली आणि तिने विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर स्वाराती रुग्णालायात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून टवाळखोरांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे. गावातील अशोक रामदास केदार (वय-१९) हा टवाळखोर तिला त्रास देत होता. हा प्रकार तिने मामाला सांगितल्यावर मामाने गावात बैठक बोलावून त्या मुलाला समजावून सांगितले. मात्र काही दिवसांनी त्याने मुलीला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. ति शाळेत जात असताना तिची छेड काढू लागला. तसेच त्याने मामाला जीवे मारुन टाकण्याची धमकी मुलीला दिली. अशोक केदार याच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अशोक केदार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केले असून आरोपी फरार झाला आहे. पोलिसांनी आरोपीच्या भावासह त्याच्या आईला ताब्यात घेतले आहे.