भाजपात प्रवेश देणे आहे

मंगळवार, 30 जुलै 2019 (09:21 IST)
विधानसभा निवडणुका जवळ आल्याने सध्या विरोधक धास्तावले असून, अनेक नेते कार्यकर्ते आपला पक्ष सोडून भापला पहिली तर शिवसेनेला दुसरी पसंती देत त्यात प्रवेश करत आहेत. सध्या याचा मोठा फटका राष्ट्रवादी कॉंग्रेसला बसतांना दिसत आहे. या आगोदर मुंबई येथे राष्ट्रवादी नेते सचिन अहिर यांनी शिवसेना पक्षात केलेल्या प्रवेशामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला होता, आता नवी मुंबईत राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादीच्या ५२ नगरसेवकांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला असून, सोबतच गणेश नाईक भाजपात जाणार की नाही? हा निर्णय होणे अद्याप झालेला नाही. सोबतच शिवेंद्रसिंहराजे भोसले हेदेखील भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार राजकीय चर्चा आहे. मात्र पाट्यांचे आणि सुचानाचे शहर असलेल्या पक्ष प्रवेशावरून पुण्यात पोस्टर लावत जोरदार टोलेबाजी करण्यात आली आहे. हे पोस्टर चर्चेचा विषय झाले आहे. एका अनोळखी व्यक्तीकडून हे पोस्टर लावले असून, जसे नोकरीची जाहिरात देतात तसाच उल्लेख करत भाजपा प्रवेश देणे आहे असे पोस्टरवर लिहिले आहे. इतकंच नाही तर यासोबत नियम व अटीही देण्यात आल्या असून, ईडी व इन्कम टॅक्स नोटीस आलेल्यांना प्राधान्य, भ्रष्टाचाराचा अनुभव असल्यास पहिली पसंती आणि सहकार क्षेत्र बुडवल्याचा अनुभव अशा प्रमुख अटी असल्याची खिल्ली पोस्टरमध्ये उडवण्यात आली आहे. विचारधारेची कुठलीही अट नाही असं सांगताना आमच्याकडी जागा फुल झाल्यास मित्रशाखेत अॅडजस्ट करता येईल असा टोला लगावण्यात आला आहे. कारण भाजपासोबत शिवसेनेतही काही नेत्यांनी प्रवेश केले आहेत. त्यामुळे हे पोस्टर सध्या सोशल मिडिया आणि पुणे येथे चर्चेचा विषय झाला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती