धक्कादायक ! पाणी समजून नगरसेवकाचा कार्यकर्ता ॲसिड प्यायला

शुक्रवार, 28 मे 2021 (07:35 IST)
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील क्रीडा समिती सभापतीच्या दालनात एका नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांने पाणी समजून ॲसिड प्यायलाचा प्रकार समोर आला आहे. या कार्यकर्त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
 
नगरसेवक राजू बनसोडे यांचे कार्यकर्ते आप्पा गायकवाड हे पाणी समजून ॲसिड प्यायले आहेत. बनसोडे यांचे कार्यकर्ते  महापालिकेतील क्रीडा समिती सभापतींच्या दालनात बसले होते. तिथे एका बॉटेलमध्ये ॲसिड ठेवले होते. पाणी समजून आप्पा गायकवाड यांनी ॲसिड पिले. त्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले.
 
दरम्यान, साफसफाई कर्मचा-यांनी ॲसिडची बॉटल दालनात कशासाठी ठेवली. निष्काळजीपणा करणा-या सफाई कंत्राटदार व त्यांच्या कर्मचाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी. त्यांचे कंत्राट काढून घ्यावे, अशी मागणी क्रीडा सभापती उत्तम केंदळे व नगरसेवक राजू बनसोडे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती