आरोपी मोईनुद्दीन याला दारूचे व्यसन होते. दारूवरून त्याचे त्याच्या पत्नीशी नेहमीच वाद व्हायचे. गुरुवारी दारू पिण्यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि विकोपाला जाऊन त्याने पत्नीला मारहाण केली. या प्रकरणात ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीनं रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. घडलेल्या या प्रकारानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असून आरोपी मोईनुद्दीन अन्सारीला रेल्वे पोलिसांनी मालाडच्या मालवणी येथून त्याला अटक केली.