विकास चव्हाण वय वर्ष 23 असे या मयत तरुणाचे नाव आहे.तो अहमदनगरच्या पार्थडीतील हरीचा तांडा येथील रहिवाशी होता.विकासच्या घराची आर्थिक परिस्थिती बेताची आहे.त्याचा भाऊ ऊसतोड मजूर आहे.विकास हा बालपणापासून एका पायाने अधू होता.विकास याला सरकारी अधिकारी होण्याची इच्छा होती.त्याची आई सतत आजारी असायची.विकास मेहनती असून त्याने बँकेच्या परीक्षेसाठी खूप मेहनत केली होती.आणि तो बँकेची परीक्षा देण्यासाठी औरंगाबादला आला होता.एसटीने उतरल्यावर रात्र जास्त झाल्यामुळे एसटी बसस्टॅण्ड वर रात्र काढली आणि पहाटे उठून तो परीक्षेच्या सेंटरवर जाण्यासाठी वाहन शोधत असताना त्याने फिरोजखान नावाच्या या व्यक्तीकडून लिफ्ट घेतली.
तुला केंद्रावर सोडतो असं म्हणत फिरोजने त्याला दुचाकीवर बसविले आणि एका कब्रस्तानात नेऊन फिरोजने विकासच्या पोटात धारदार शस्त्राने वार केले. बेसावध असल्याने विकासला काय घडत आहे कळालेच नाही फिरोजने त्याच्या पोटात लागोपाठ वार केल्याने विकासचा जागीच मृत्यू झाला.एवढेच नव्हे तर फिरोजने विकासच्या जवळ असलेले पाचशे रुपये आणि काही वस्तू घेऊन पळ काढला.