ठाण्याच्या वर्तक नगर परिसरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका परिसरात बांधकाम सुरु असताना इमारतीवर लावल्या जाणाऱ्या लोखंडी सळईवर एक तरुण जोरात पडला आणि सळई त्याच्या कंबरेतून घुसून उजव्या पायाच्या जांघेतून बाहेर निघाली. एवढेच नाही तर हा तरुण शुद्धीवर होता. त्याला तातडीनं उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वृत्तानुसार, रविवारी रौनक रेसिडेंसीच्या निर्माणाधीन बांधकाम वर राहणाऱ्या सुरक्षा रक्षकाला एका तरुण लोखंडच्या सळईवर पडलेला दिसला. हा तरुण बांधकामावर कामाला नाही. हा तरुण इमारतीवरून थेट खाली बांधकामाच्या साच्यासाठी लावलेल्या लोखंडी सळईवर पडलेला दिसला.
त्याच्या कंबरेतून मिळाली घुसून थेट उजव्या पायाच्या जांघेतून निघाली होती. हा तरुण नेमका तिथे कसा आला आणि तो वरून कसा काय पडला हे प्रश्न उद्भवत आहे. सुरक्षा रक्षकाने इतर कामगारांना बोलवून घेतले. त्या कामगारांनी त्या तरुणाच्या आतील सळईला मुख्य संचापासून वेगळे केले आणि तरुणाला रुग्णवाहिकेतून एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून पोलिसांना कळविले. हा तरुण तिथे कसा काय पोहोचला याचा तपास पोलीस लावत आहे.