'याल अंगावर तर घेऊ शिंगावर!', शाह यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे विधान

लोकसभा निवडणुकीत युती करण्याच्या मुद्द्यावर भाजप आणि पक्षाची जुनी सहयोगी शिवसेना यांच्यात शब्दांचे वार सुरू झाले आहेत. एका दिवसापूर्वीच भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी अप्रत्यक्ष रूपाने शिवसेनेला चेतावणी दिली की युती केली तर चांगलाच नाही तर निवडणुकीत माजी सहकार्यांना फेकून देणार. यावर शिवसेनेने म्हटले की त्यांच्याशी भिडणार्‍यांना ते तोंड देयला तयार आहेत.
 
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शाह यांच्या वक्तव्यावर विधान करत म्हटले की "शिवसेना पोकळ धमक्या आणि पाद्रया पावट्यांच्या इशार्‍यांना कधीच घाबरली नाही. शिवसेनेचे काळीज वाघाचा आहे. अफजल खान आणि औरंगजेब आम्हीच पटकवले, इतक्या लवकर विसरलात?
 
शाह यांचे वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या त्या वक्तव्यानंतर आले आहे ज्यात पक्ष कार्यकर्त्यांना राज्याच्या 48 लोकसभा जागांमधून 40 वर विजय मिळवण्याचा लक्ष्य निर्धारित करायला सांगितले गेले होते.
 

याल अंगावर तर घेऊ शिंगावर!! pic.twitter.com/41h04EwVNa

— ShivSena - शिवसेना (@ShivSena) January 6, 2019
शिवसेनेने म्हटले की बीजेपीला अहंकार झाला असून जनता त्यांना आरसा दाखवेल. शिवसेनेने म्हटले की 'देशातील जनतेने आधीपासूनच बीजेपीला नकार देयला सुरुवात केली आहे. पाची राज्यांमध्ये हे स्पष्ट दिसून आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती