शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित 'ठाकरे' चित्रपटाचा ट्रेलर प्रसारित झाला आहे. या चित्रपटातील तीन संवादांवर सेन्सॉर बोर्डानं आक्षेप नोंदवला असून, ठाकरे चित्रपटाची निर्मिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे सेन्सॉर बोर्डानं घेतलेल्या आक्षेपांवर शिवसेनेची भूमिका नेमकी काय असणार, याबद्दल उत्सुकता आहे.
शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची अनेक भाषणं, त्यामधील विधानं वादात सापडली. त्याचप्रमाणे ठाकरे यांच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपटदेखील काहीसा वादात सापडताना दिसत आहे. या चित्रपटातील तीन संवादांवर सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतला.
दक्षिण भारतीयांमुळे स्थानिक मराठी माणसाचा रोजगार जातो, अशी भूमिका त्यावेळी बाळासाहेबांनी घेतली होती. यावर आधारित चित्रपटातील संवादावर सेन्सॉर बोर्डानं हरकत नोंदवली. या संवादात 'यांडू गुंडू' असे शब्द आहेत.