शिवसेना रामदास कदम यांच्यावर नाराज, पालकमंत्री पद काढले

गुरूवार, 18 जानेवारी 2018 (09:36 IST)
शिवसेनेत अंतर्गत कलह दिसून येतो आहे. यात रामदास कदम यांना शिवसेना  पक्षाती नाराजी चांगली महागात पडल्याचे दिसून येते आहे. या नाराजी मुळे  त्यांना औरंगाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन हटविण्यात आले असणार असे चित्र निर्माण झाले आहे. यात नवीन निर्णयानुसार राज्य शासनाने तीन जिल्ह्यांचे पालकमंत्री बदललेले आहेत.  याबाबतचे राज्य सरकारने अधिकृत  परिपत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये औरंगाबाद, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे. आता या शासनाच्या नवीन निर्णयानुसार औरंगाबादचे पालकंमत्रीपद रामदास कदम यांच्याकडून काढून घेऊन ते डॉ. दीपक सावंत यांच्याकडे दिले आहे.  औरंगाबादच्या नामांतरावरून खासदार चंद्रकांत खैरे आणि रामदास कदम यांच्यात वाद झाला होता. या वादावरुन त्यांना हटविल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. तसेच भाजपवरही कदम यांनी जोरदार टीका केली. खैरे यांच्या वादानंतर रामदास कदमांची औरंगाबादच्या पालकमंत्रिपदावरून काढेल आहे असे  चर्चा राजकीय वर्तुळात आहे. रामदास कदमांच्या जागी डॉ. दीपक सावंत यांच्याकडे औरंगाबादचे पालकमंत्रिपद सोपवण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता रामदास कदम काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती