गेले काही दिवस एकमेकांविरोधात गळे काढणारे शिवसेना भाजपा पक्ष पुन्हा सत्तेसाठी एकत्र आले आहेत. तर भाजपाने सर्व मुद्द्यावर बोलणे टाळत शिवसेनेला मुंबई महापालिकेत पाठींबा दिला आहे. मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज निवडणूक होत आहे. या निवडणुकीसोबतच सभागृह नेत्याचीही निवड होणार आहे.ही फक्त औपचारिक घोषणा असून शिवसेना सत्तेत येणार आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 3.30 ते 4 वाजेपर्यंत मुंबई महापालिकेत पोहोचणार, मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ‘मातोश्री’हून निघणार शिवसेनेचे 88 नगरसेवक + भाजपचे 83 नगरसेवक, एकूण 171 नगरसेवकांचा विश्वनाथ महाडेश्वर यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मुंबई पुन्हा शिवसेनच्या सत्तेत आली आहे