संजय राऊतांमुळेच शिवसेना फुटली त्यामुळे त्यांना मी महत्त्व देत नाही : शंभूराज देसाई

बुधवार, 6 जुलै 2022 (15:15 IST)
शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलेआहे. संजय राऊतांना महत्त्व देत नाही असे देसाई यांचे म्हणणे आहे. शंभूराज देसाई म्हणाले की संजय राऊतांमुळेच शिवसेना फुटली. यामुळे त्यांना मी महत्त्व देत नाही.

तसेच ते म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जे बोलतात ते कधीच खरे ठरत नाही.
 
शंभूराज देसाई सातारा दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय का घेतला याबाबत माहिती दिली. खासदार संजय राऊत यांनी पक्षांमध्ये वेळोवेळी करत असलेली ढवळाढवळ आणि आमदारांना दिलेली दुजाभावची वागणूक याचं घटनेला विरोध करत 40 आमदार शिवसेनेतून बाहेर पडले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती