शिवसेनेचं आंदोलन म्हणजे नौटंकी : फडणवीस

गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (15:38 IST)
भारतात जे इंधन आयात केलं जातं, त्याची लॅंड कॉस्ट ३० रुपये प्रति लीटर असताना केंद्र सरकार २३ टक्के अबकारी कर तर राज्य सरकार व्हॅट, स्वच्छता, कोविड यासारखे सेस आकारत असल्याने एकंदर कर आकारणी ५० रुपये झाल्याने इंधनाचे भाव उच्चांकी पातळीला पोहचले आहेत. इंधन दरवाढीविरोधात शिवसेना आता आंदोलन करणार आहे. मात्र, शिवसेनेचं आंदोलन म्हणजे नौटंकी असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.  
 
पेट्रोल डिझेलचे दर दररोज वाढतायेत. दिवसेंदिस वाढणाऱ्या दराने आता पेट्रोल शंभरी पार करण्यासारखी स्थिती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलांच्या किंमती कमी असतानाही आपल्याकडे पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडलेत. याच पार्श्वभूमीवर येत्या 5 तारखेला शिवसेना राज्यभर वाढवाढीविरोधात मोर्चे काढून केंद्र शासनाचा निषेध करणार आहे. त्यासंदर्भात फडणवीस यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, राज्य सरकारनेच टॅक्स कमी करुन पेट्रोलचे भाव कमी करावेत, अशी सूचना केली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती