शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिन : ‘अग्निवीर नावाचं टूमणं काढलंय, पण तीन-चार वर्षानंतर या मुलांच्या नोकरीचं काय?’- उद्धव ठाकरे

रविवार, 19 जून 2022 (14:07 IST)
CM Uddhav Thackeray on Shiv Sena Vardhapan Din :शिवसेना आज आपला 56 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. मला उद्याच्या निवडणुकीची चिंता नाही, हारजीत होत असते. उद्या जिंकणारच आहोत. राज्यसभेत एकही मत फुटलं नाही. कोणी काय कलाकारी केली मला माहित आहे. फुटलं कोण त्यात अंदाज लावला आहे. त्याचा हळूहळू उलगडा होईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
 
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
 
यावेळी ते विधान परिषद निवडणूक आणि केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविषयी बोलले आहेत.
 
ते म्हणाले, "मी रावते आणि देसाई यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली नाही. पण त्यांच्यात धूसपूस नाही. हा खरा शिवसैनिक. निवडणूक म्हटलं की आमदारांची बडदास्त ठेवावी लागते.
 
"उद्याची निवडणूक आमच्यात फूट पडणार नाही हे दाखवणारी. सत्तेपुढे शहाणपण आणि माज चालणार नाही."
 
"आता शिवसेनेत गद्दार मनाचा कोणीच नाही. आत हिंदुत्वाचे डंके पिटत आहेत. गर्व से कहो हम हिंदु है अशी घोषणा होती. पण हिंदु हा शब्द कोणी उच्चारत नव्हतं," असं ते पुढे म्हणाले.
 
अग्निपथ योजनेवर टीका
यावेळी उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवरही टीका केली.
 
ते म्हणाले, "अग्निपथ विरोधात तरूण रस्त्यावर उतरले आहेत, त्यांची माथी कोणी भडकवली? हातामध्ये काम नसेल तर रामराम करून काही फायदा नाही. आता परत काही टूमणं काढलंय. वचनं अशी द्या जी पूर्ण करता येतील. नोकऱ्या देऊ म्हणाले पण दिल्या नाहीत. मोठी घोषणा फक्त केली अग्निवीर. तीन-चार वर्षानंतर या मुलांच्या नोकरीचं काय?
 
"ऐन उमेदीत त्यांना मृगजळ दाखवणार पण सर्वात सर्वात गंभीर आहे भाडोत्री सैन्य. उगाच स्वप्न दाखवू नका. लोकांच्या जीवाशी खेळू नका. मग ते का नाही भडकणार. मुलांना यामागे का धाववताय. ही मुलं पुढे अंगावर आली तर झेलणार कोण?"
 :

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती