बाळासाहेबांच्या जन्मदिवशी शिवसेनेचा वचननामा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईसाठी आज वचननामा जाहीर केला आहे. बाळासाहेबांचा जन्मदिन हा वचननामा जाहीर करण्याचा योग्य दिन आहे, असं ठाकरे म्हणाले आहेत. तर आपण सर्व ठिकाणी जिंकणार असून सर्व महापालिकावर भगवा फडकलेला दिसले असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या वचननाम्यात अनेक आश्वासने दिली आहे.
 
यामध्ये मुंबई उपनगरातील असलेल्या 500 ते 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट दिली आहे. तर अनेक ठिकाणी ई-वाचनालय, आत्मरक्षण प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहेत. महापालिकेच्या विद्यार्थ्यांना महापालिकेत नोकरीस प्राधान्य दिले जाणार आहेत. तर कलेच्या साधनेसाठी महापालिकेची संगीत अकादमी उभारणार करणार आहेत. तर अनेक ठिकाणी बंद असलेले उद्यानांची पुनरउभारणी आणि जेष्ठ विरंगुळा केंद्र उभारले जाणार आहेत. तर आरोग्य सेवेत बहुरुग्ण वाहिका, आरोग्य सेवा आपल्या दारी, वृद्ध रुग्णांना घरी जाऊन उपचार देणार आणि सोबतचा सार्वजनिक स्वच्छता गृहात महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशिन उपलब्ध केले जाणार आहेत. या प्रकारच्या अनेक आश्वासने शिवसनेने नागरिकांना दिले आहेत.

वेबदुनिया वर वाचा