अहमदनगर - साईनगर शिर्डीत रेल्वेस्थानकात कॅशलेस व्यवहारासाठी आवश्यक असलेल्या सर्व डिजीटल यंत्रणा उभारणीचे काम पूर्ण झाले असून, सोलापूर मध्य रेल्वे विभागात साईनगर शिर्डी पहिले कॅशलेस स्थानक ठरले असल्याची माहिती सोलापूर मध्य रेल्वेच्या वरिष्ठ वाणिज्य प्रबंधकांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीनंतर कॅशलेस व्यवहार करण्याचे आव्हान जनतेला केले होते.
या रेल्वेस्थानकात रेल्वे तिकीट, आरक्षित रेल्वे तिकीट, भोजनगृह व पार्सल कार्यालय, आदी ठिकाणी पॉईंट ऑफ सेल ही कॅशलेस मशीन उपलब्ध करण्यात आली आहे. साईभक्त व रेल्वे प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने केले आहे.