पंढरपूर यात्रेसाठी राज्यातून आणि दूरवरून भाविक आणि वारकरी येतात त्यांची गैरसोय होऊ नये या साठी एसटीच्या अतिरिक्त बसेस सोडणार आहे. प्रवाशांचा सोयी साठी पंढरपूरच्या चंद्रभागा, पांडुरंग आयटीआय कॉलेज , विठ्ठल कारखाना आणि भीमा या ठिकाणी तात्पुरती बस स्थानक उभारणार आहे.या बस स्थानकात सुलभ शौचालय, पिण्याचे पाणी, चौकशी कक्ष, संगणकीय आरक्षण केंद्र, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी सुविधा देण्यात येणार आहे. यात्रेसाठी सुमारे 5000 गाड्या सोडण्याचे नियोजन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.आषाढी यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा विभागातून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.