श्री गजानन महाराजांच्या 145 व्या प्रकट दिनानिमित्त 13 फेब्रुवारी म्हणजेच सोमवारी शेगावमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. प्रकट दिनानिमित्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर मध्यप्रदेश आणि गुजरात इथून देखील पालख्या शेगावात दाखल झाल्या आहेत. हिंदू दिनदर्शिकेनुसार श्री गजानन महाराज प्रकट दिन दरवर्षी माघ कृष्ण पक्ष सप्तमी तिथीला साजरा केला जातो.
शेगावात गणगण गणात बोते चा गजर पाहायला मिळत आहे. संपूर्ण मंदिर परिसर सजवण्यात आले आहे. संपूर्ण शेगाव पूजा- आरती, पालखी सोहळा, अभिषेक, याने भक्तिमय झाला आहे. तर पारायण करुन भाविक महाराजांचा आशिर्वाद घेत आहे. इतर राज्यातून हजारो भाविक आपल्या दिंड्या घेऊन शेगावात दाखल झाल्या आहेत.