अजित पवार यांनी राष्ट्रवादीशी संबंध तोडून आपल्या समर्थक आमदारांसह भाजप-शिवसेना युतीमध्ये प्रवेश केला. त्यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाले. अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून महायुतीला साथ दिली. अजित पवार यांनी या पूर्वी देखील महायुतीत येण्याचा प्रयत्न केला मात्र ते यशस्वी झाले नाही. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी गौप्य स्फोट केला आहे. ते म्हणाले की शरद पवार अजितपवारांना लोकांसमोर व्हिलन ठरवायचे.
ते म्हणाले , शरद पवारांना भाजपसोबत युती करायची होती त्यांनी तीनदा या संदर्भात निर्णय घेतला मात्र घेतला नाही. आता त्याचे विश्लेषण केले तर असे वाटते की शरद पवार हे नेहमीच अजित दादांना पुढे करत व्हिलन ठरवत असे. याचे कारण म्हणजे की राष्ट्रवादीचा पक्ष अजित दादांसोबत होता. त्यांना व्हिलन करायचा विचार शरद पवारांनी केला. कारण राष्ट्रवादीवर त्यांना आपलीच सत्ता हवी होती.
अजित पवारांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर ते म्हणाले, मी 2009 ते 2012 पर्यंत अजित पवारांवर आरोप केले ते त्यावेळी मंत्री होते. या आरोपांची चौकशी केल्यावर अनेक भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना निलंबित केले अनेकांना शिक्षा दिली. त्यावेळी अजितपवार विभाग प्रमुख होते. या प्रकरणाचा तपास केल्यावर अजित पवारांचा त्याच्याशी थेट संबंध आढळला नाही. त्यामुळे त्यांचे नाव आरोपपत्रात आले नाही.