केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा एक निर्णय घेताना दिसत नाही. त्यामुळे आगामी काळात लोकशाही मार्गाने त्यांच्याकडून सत्ता हिसकावून घेऊ, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
सीबीआयला सध्या वेठीस धरण्याचा प्रयत्न होतो आहे. सीबीआयच्या अधिकार्याला रातोरात हकालपट्टी केली जाते आणि स्वतःच्या विचाराच्या व्यक्तीला तिथे पाठवले जाते. यातून सरकारचा कारभार दिसतो आहे. आम्ही म्हणतो तसे वागले पाहिजे, असे यातून सत्ताधार्यांना दाखवून द्यायचे आहे. न्याय व्यवस्थेवर आणि तपास यंत्रणेवर विश्वास नाही, अशा व्यक्तीच्या हाती देशाची सत्ता आहे. त्यामुळे देश धोक्यात आहे, अशी टीका पवार यांनी पंतप्रधान मोदींचे नाव न घेता केली.