महाराष्ट्रातील जालना शहरात मंगळवारी सकाळी एका सात वर्षांच्या मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. गांधी नगर परिसरातील घटनेनंतर, जालना महानगरपालिका (जेएमसी) आयुक्तांनी "कर्तव्येत निष्काळजीपणा" केल्याबद्दल एका स्वच्छता निरीक्षकाला निलंबित केले. या घटनेमुळे स्थानिक लोकांमध्ये संतापाची लाट उसळत आहे.
संध्या पाटोळे असे या मृत मुलीचे नाव आहे. संध्या घराजवळ अंगणात खेळत असताना भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. कुटुंबात आधीच एका नातेवाईकाच्या मृत्यूमुळे शोकाकुल होते. घरात काही लोक जमले होते. संध्या घरा बाहेरील अंगणात खेळू लागली तेव्हा तिच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला आणि तिला काही अंतरापर्यंत फरफटत नेले. कुत्र्यांनी तिच्या पोटावर आणि मानेवर हल्ला केला. असे संध्याचे काका राम पाटोळे यांनी सांगितले.