मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या फेरीत भाजपाच्या समाधान अवताडेंनी 450 मतांनी आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीत अवताडेंना 2 हजार 844 तर भालकेंना 2 हजार 494 मतं मिळाली. दुसऱ्या फेरीत मात्र भालकेंनी 500 हून आधिक मतांची आघाडी मिळवली. दुसऱ्या फेरीत भालकेंना 3 हजार 112 तर अवताडेंना 2 हजार 648 मतं मिळाली. तिसऱ्या फेरीअखेरीस भालकेंनी 635 मतांची आघाडी मिळवलीय. भालकेंना तिसऱ्या फेरीनंतर एकूण 8 हजार 613 मतं मिळाली आहेत तर आवताडेंना 7 हजार 978 मतं मिळाली आहेत. सातव्या फेरीपासून मात्र अवताडेंनी आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत कायम ठेवली.
समाधान आवताडे (भाजप) – 109450 मते
भगीरथ भालके (राष्ट्रवादी) – 105717 मते
बिराप्पा मधूकर मोटे (वंचित बहूजन आघाडी) -1196 मते
अभिजीत बिचकुले (अपक्ष) – 137
गोडसे धनंजय (बहूजन विकास आघाडी) – 1607 मते
भरत आवारे (बहूजन महा पार्टी) – 469 मते