जिल्ह्यातील ‘या’ शहरात आता नो एन्ट्री, रस्ते केले पालिकेने बंद

सोमवार, 3 मे 2021 (16:16 IST)
कोपरगाव शहरात आज रुग्णसंख्येने काहीसा दिलासा दिला असला तरी धोका मात्र टळलेला नाही.
 
कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी कोपरगाव पालिकेने संपूर्ण शहरातील रस्ते ८ मे पर्यंत बंद केले असून, फक्त साई कॉर्नर पासूनच अत्यावश्यक कामासाठी ये-जा करण्यास रस्ता खुला ठेवला आहे.
 
यामुळे शहरवासियांनी विनाकारण घराबाहेर न पडता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केले आहे. शहरात व ग्रामीण भागात रोज बाधित रुग्ण आढळत आहे.
 
हे संक्रमण रोखण्यासाठी शासनाने १५ मे पर्यंत कठोर निर्बंध लागू केलेले आहेत. त्याची प्रशासन तंतोतंत अंमलबजावणी करत असताना स्थानिक पातळीवर ८ मे पर्यंत जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे.याचा परिणाम आज सकारात्मक दिसून अवघे ६९ रुग्ण आढळले असले तरी धोका मात्र टळलेला नाही. या पार्श्वभूमीवर पालिकेने साखळी तोडण्यासाठी शहरातील रस्ते ८ मे पर्यंत पूर्ण बंद केले आहेत.
 
फक्त अत्यावश्यक कामासाठी साई कॉर्नर येथील रस्ता खुला ठेवण्यात आला आहे. यामुळे शहरातील नागरिक बाहेर जाऊ शकत नाही,
 
तर बाहेरील देखील शहरात येऊ शकणार नाही, असे मुख्याधिकरी सरोदे यांनी स्पष्ट केले आहे. या नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती