महाराष्ट्रातील शाळांची टॉपस्कोररला पसंती

शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 (12:43 IST)
टॉपस्कोरर डिजिटल लर्निंग साधन
 
नवनीत प्रकाशनाने नुकतेच सादर केलेले टॉपस्कोरर डिजिटल लर्निंग साधन अल्पावधीतच शाळा आणि शिक्षकांमध्ये चांगलेच लोकप्रिय ठरत आहे. महाराष्ट्र आणि गुजरात मधल्या सुमारे ३००० शाळांमध्ये हे साधन बसविण्यात आले असून ५००० पेक्षा जास्त शिक्षकांना टॉप स्कोरर हाताळण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
 
आतापर्यंत टॉपस्कोररची चाचणी होऊन ते २ राज्यामधील ३००० पेक्षा अधिक शाळांमध्ये पोहोचले असून त्याचा फायदा १० लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना झाला आहे. पारंपरिक शिक्षणपद्धतीला फाटा देऊन शिक्षण प्रणाली अधिक आधुनिक करणे हाच या मागचा मुख्य उद्देश आहे. आनंदाची बाब म्हणजे आता टॉपस्कोरर हे अँपच्या रूपातही उपलब्ध आहे.
 
इसेन्स लर्निंगचे संचालक हर्षिल गाला म्हणतात, " शिक्षण पद्धती अधिक परस्पर समावेशक करणे हाच टॉपस्कोरर उपक्रम सुरु करण्याचा मुख्य उद्देश होता. सध्याची मुलं अधिक स्मार्ट बनली असून तंत्रज्ञानाचा सराईतपणे वापर करतात तर मग या तंत्रज्ञान आणि शिक्षणाचा एकत्र मेळ का साधता येणार नाही". 
 
क्लासरूम या नवीन उपक्रमाबद्दल बोलताना हर्षिल म्हणाले, "शिक्षणामध्ये टॉपस्कोररला दुय्यम स्थान मिळू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील असून टॉपक्लासची  सुरुवात केली आणि शाळांमध्ये त्याची स्थापनाही केली ज्यामुळे शिक्षकांमध्ये टॉपस्कोरर लोकप्रिय होऊ शकेल."
 
टॉपस्कोररनं शिक्षण प्रक्रियेत अभूतपूर्व परिवर्तन घडवून आणले असून ते साकारण्यात ऑडिओ- व्हिज्युअल्स, मूल्यांकन संगणकप्रणाली, प्रश्नसंच आणि विश्लेषणात्मक अहवाल या बाबीही तितक्याच महत्वपूर्ण आहेत. टॉपस्कोररच्या मदतीने विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अधिक सोप्पे झाले असून, विषयाचे आकलन आणि एखादा धडा लक्षात ठेवण्याची क्षमता वाढण्यात मदत होते. पाठ्यपुस्तकी विषयाचे खोलवर आकलन चांगल्या प्रकारे होण्यासाठी विद्यार्थ्यांची पहिली पसंत टॉप स्कोररलाच मिळाली आहे. 
 
टॉपस्कोरर बद्दल :
टॉपस्कोरर हे ऑनलाईन ज्ञानार्जनाचं व्यासपीठ असून पहिली ते दहावी सीबीएसई बोर्ड, गुजरात (जीएसईबी) आणि महाराष्ट्र बोर्ड साठी स्मार्ट शिक्षण पद्धती प्रणाली उपलब्ध करून देतं. टॉपस्कोररनं निवडक विषयांसाठी शिकण्याचे संच तयार केले असून शिकणे अतिशय सोप्पं, आनंददाई आणि प्रमाणबद्ध होते. ऑडिओ- विज्युअल्स सोबत पुरवलेली माहिती, सर्वसमावेशक नोट्स, भक्कम मूल्यांकन करणारे इंजिन आदी बाबींमुळे डिजिटल शिक्षण पद्धतीतील उत्कृष्ट साधन म्हणे टॉपस्कोरर, जे कधीही, कुठेही आणि विविध आकारांमध्ये उपलब्ध आहे. टॉप स्कोररची सर वर्गामधील शिकवणीलासुद्धा मागे सारेल. 

वेबदुनिया वर वाचा