पाचवी आणि आठवीच्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा 8 ऑगस्टला

बुधवार, 21 जुलै 2021 (15:36 IST)
कोरोना प्रादुर्भावामुळे सातत्याने पुढे ढकलण्यात आलेली इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा आता 8 ऑगस्ट रोजी होणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले.शालेय शिक्षण विभागाने परीक्षा घेण्यासाठी मान्यता दिली असून, कोरोना नियमांचे पालन करून ही परीक्षा होणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले.पाचवी आणि आठवीत असलेले विद्यार्थी आता पुढील वर्गात गेले असले तरी ही परीक्षा देता येणार आहे.
 
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची सवय व्हावी या उद्देशाने दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. परिषदेमार्फत घेण्यात येणार्‍या शिष्यवृत्ती परीक्षेला यंदा राज्यभरातून ६ लाख ३२ हजार ४७८ विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे.पाचवीच्या विद्यार्थ्यांची संख्या ३ लाख ८८ हजार ३३५ तर आठवीच्या विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ४४ हजार १४३ इतकी आहे. राज्यातील ४७ हजार ४६२ शाळांमधील विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. तर परीक्षा घेण्यासाठी राज्यभरामध्ये ५ हजार ६८७ इतकी केंद्र आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मे रोजी होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती