सप्तश्रृंगीगड : देवीचे मंदीर १७ ते २१ जून दर्शनासाठी बंद

शनिवार, 17 जून 2017 (10:45 IST)
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या वणी येथील श्री क्षेत्र सप्तश्रृंगीगडावर असलेले देवीचे मंदीर १७ ते २१ जून असे चार दिवस मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर सोमवारी सायंकाळी मोठा दगड कोसळला. मात्र मंदिरावर लावण्यात आलेल्या मोठ्या जाळ्यांमुळे सदरचा दगड या संरक्षण जाळ्यांमध्ये अडकून पडला आहे. यामुळे मंदिराला धोका नसला तरी दगड काढणे आवश्यक आहे. याकरिता मंदीर बंद ठेवण्यात येणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा