सोंगाड्या चित्रपट निघाला असता संजय राऊत यांनाच भूमिका मिळाली असती : महाजन

बुधवार, 27 एप्रिल 2022 (23:35 IST)
भाजप नेते आणि आमदार गिरीश महाजन यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. सोंगाड्या चित्रपट निघाला असता संजय राऊत यांनाच भूमिका मिळाली असती, असं वक्तव्य महाजन यांनी केलं आहे.
 
भाजप नेते गिरीश महाजन हे आज नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. यावेळी महाजन म्हणाले की, ‘जखम किती होती याला महत्व नाही, हल्ला झाला, दगडफेक झाली हे महत्वाचे आहे.’ टोमॅटो सॉस होता तर तुम्ही त्याची चव घेतली का, गोड वाटलं का, असा सवाल महाजन यांनी केला आहे. त्यांनी संजय राऊतांवर टीका करताना म्हटलं आहे की, ‘सोंगाड्या चित्रपट निघाला असता संजय राऊत यांनाच भूमिका मिळाली असती.
 
ते पुढे म्हणाले कि, झेड सिक्युरिटी असलेल्यांवर हल्ला होतो, यासाठी आमचा आक्षेप असून या संदर्भात आज राज्यपालांना भेटणार कारण तक्रार दाखल होत नाही. संजय राऊत यांच्या कुठल्या प्रश्नाला उत्तर द्यावे हे कळत नाही, सकाळ, संध्याकाळ त्यांचा भोंगा सुरू असतो. त्यांच्या म्हणण्याला लोक देखील कंटाळले असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
 महाजन म्हणाले की, राष्ट्रपती राजवट लागू करावा की नाही, हा आढावा राज्यपाल घेतील. पण राज्यातील आजची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. सरकारला पूर्ण वेळ राजकारण करायचे आहे. राज ठाकरे यांच्या मागणीमुळे सरकार अडचणीत आले आहे. त्यामुळे त्यांची सभा होऊ नये, असा सरकार प्रयत्न करत आहे. शिवसेनेच्या सगळ्याच भूमिका बदलल्या आहेत. बाळासाहेबांची शिवसेना वेगळी होती. ही सत्तेसाठी लाचार शिवसेना असून, खुर्चीसाठी हिंदुत्वाची आहुती द्यायला तयार आहे.
 
महाजन म्हणाले की, मनसे – भाजप युतीबाबत सध्या कुठेही चर्चा नाही. भविष्यात काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. भुजबळ यांच्या पक्षाचे शहरात 6 नगरसेवक आहे. प्रशासन असल्यामुळे ते तिथे जात आहेत. हे थांबवा, ते थांबवा असं त्यांचे चालल्याचे माझ्या कानावर आले आहे. भुजबळ साहेबांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये याचे उत्तर मिळेल. एवढे मोठे मंत्री असताना, भुजबळांना छोटे खाते दिले. चांदीवाल आयोगाचा अनिल देशमुख यांच्याबाबत आलेला अहवाल न्यायप्रविष्ट आहे. मिटकरींच्या जिभेला हाड नाही. त्यांना शरद पवारांनी कानमंत्र दिला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती