बेळगाव महापालिका निवडणुकीच्या निकालावरुन भाजप आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवल्यानंतर जल्लोष केला. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. मराठी माणूस हरल्यानंतर पेढे वाटले जात आहेत, लाज वाटत नाही का? अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. या टीकेला आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.
संजय राऊत यांना स्मृतीभ्रंश झाला असावा, ते सकाळी काय बोलतात दुपारी काय आणि रात्री काय बोलतात त्यांना आठवत नाही, भाजपचे बहुतांश नगरसेवक मराठी आहेत त्यामुळं मराठी भाषिकांचा पराभव कसं म्हणता येईल, असं उत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
एखाद्या निवडणुकीच्या निकाल त्यांच्या बाजुने असतो, तेव्हा ईव्हीएम चांगलं असतं आणि ज्या वेळी निकाल त्यांच्या विरोधात लागतो तेव्हा ईव्हीएममध्ये त्यांना घोटाळा वाटतो, हे त्यांच्या स्वभावानुसारच आहे, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.