संजय राऊत शरद पवार यांच्या भेटीला

शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2022 (07:53 IST)
पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. राऊत हे तुरुंगातून बाहेर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी तुरूंगातील काही घटना देखील सांगितल्या तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. संजय राऊतांनी पवारांच्या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. 
 
त्यावेळी ते म्हणाले की, शरद पवार हे आजारी होते. आता त्यांची प्रकृती ठिक आहे. मी तुरुंगात असताना त्यांनी माझ्या कुटुंबियांची काळजी घेतली, माझ्यासाठी न्यायालयीन लढतीत त्यांनी माझी मदत केली. त्यामुळे त्यांचे आभार मानायला मी आलो होतो, असं संजय राऊत म्हणाले.
 
मी संसदेच्या अधिवेशनावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट देखील घेणार आहेत, असंही राऊत म्हणाले. शिवसेना एकच आहे, हा गट आणि तो गट नाही, आम्ही राजकीय लढाई लढू. मी फडणवीसांना भेटणार आहे. राज्याचे काही प्रश्न आहेत. ते त्यांच्यासमोर मांडायचे आहेत. ते राज्याचे प्रमुख आहेत, गृहमंत्री आहेत. तुरुंगातील काही प्रश्न त्यांच्यासमोर मांडायचे आहेत, असंही राऊत म्हणाले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती