फडणवीस यांची भेट घेणार, तेच राज्य चालवत आहेत: संजय राऊत

गुरूवार, 10 नोव्हेंबर 2022 (13:48 IST)
मनी लाँड्रिंग प्रकरणात विशेष न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्यसभा सदस्य संजय राऊत तुरुंगातून बाहेर आले आहेत. तुरुंगातून बाहेर येताच राऊत यांच्या बोलण्यात नरमी दिसली आणि त्यांनी विद्यमान सरकारच्या कामाचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची लवकरच भेट घेऊन स्वत:सोबत काय घडले ते सांगणार असल्याचेही ते बोलले. राऊत म्हणाले, माझ्या पक्षाला जे काही भोगावे लागले ते आम्ही भोगले. आता पुढे पाहू.
 
महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आल्यावर राऊत म्हणाले की या सरकारने चांगले काम केले आहे आणि मी त्यांचे कौतुक करतो. सरकारने नुकतेच उत्कृष्ट निर्णय घेतले आहेत, मी त्यांचे स्वागत करतो. मला काही काम आहे त्यामुळे मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य चालवत असल्याने त्यांच्याशी बोलेन. मी ईडीच्या विरोधात काहीही बोलणार नाही, फक्त निषेध करण्यासाठी आम्ही काहीही बोलणार नाही.
 
म्हाडाला पुन्हा अधिकार देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसांनी घेतला आहे. तो अतिशय चांगला निर्णय आहे, असं म्हणत", संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. राज्यातील सरकार उपमुख्यमंत्री फडणवीस हेच चालवत आहेत. मी लवकरच त्यांची भेट घेणार आहे, असं राऊत म्हणाले. तसंच दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती