हिंदीची सक्ती करू नये,राज्यात मराठीची सक्ती करावी म्हणत संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

शुक्रवार, 18 एप्रिल 2025 (12:50 IST)
सध्या राज्यात हिंदी भाषा अनिवार्य केल्यामुळे गदारोळ सुरु आहे. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मराठी भाषेची सक्ती करण्याबाबत विधान केले आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. 
ALSO READ: 'आम्ही हिंदू आहोत, पण हिंदी नाही', भाषेवरून राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांशी भिडले, म्हणाले- सहन करणार नाही
ते म्हणाले, हिंदी राष्ट्रभाषा आहे आणि महाराष्ट्रात हिंदी अधिकृत भाषा आहे. राज्यात हिंदी भाषेची सक्ती करण्याऐवजी मराठी भाषेची सक्ती करावी. 

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मायबोली मराठी कडे लक्ष दिले पाहिजे. फक्त कागदांवर मराठीची सक्ती असून काहीच उपयोग नाही. जो पर्यंत मराठी भाषेला प्रत्यक्षात अमलात आणले जात नाहीं. तो पर्यंत मराठी भाषेला आदर मिळणार नाही. असं म्हणत संजय राऊतांनी हल्लाबोल केला. 
ALSO READ: आम्ही हिंदू आहोत, पण हिंदी नाही!" मनसेने बॅनर लावले,हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक
ते म्हणाले, आपण कधी भाजपच्या नेत्यांना मराठीच्या बाजूने बोलताना पहिले आहे का? महाराष्ट्र स्थापनेत यांचे काही योगदान नाही. बेळगावात मराठी भाषिकांवर अत्याचार होत आहे. त्याबद्दल कोणी आवाज उठवला नाही. 
ALSO READ: महाराष्ट्रात हिंदी सक्ती खपवून घेणार नाही, राज ठाकरे संतापले; सरकारला हा इशारा दिला
मोदी आणि शाह यांना अंग्रेजी येत नाही त्यामुळे हिंदी आपल्यावर लादू नये. ज्या ठिकाणी हिंदी बोलली जात नाही तिथे हिंदी साठी सक्ती करू नका. विद्यार्थ्यांवर ओझे लादू नका. आम्हाला हिंदी शिकवू नका, गुजरातला जाऊन  शिकवा. कुठूनतरी येणाऱ्या लिपी वाचू नका, कधी तुम्ही हिंदू बनता, कधी मराठी, काहीतरी ठरवा.महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत मराठी भाषेची सक्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती