Sandipan Bhumare-Ambadas Danve : भर बैठकीत अंबादास दानवे आणि संदीपान भुमरे एकमेकांना भिडले

सोमवार, 7 ऑगस्ट 2023 (16:49 IST)
social media
Chatrapti sambhaji Nagar : छत्रपती संभाजी नगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात छत्रपती संभाजी नगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदारांना दिल्या जाणाऱ्या निधीवरून एकमेकांना भिडले आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. विरोधी पक्षांच्या आमदारांना कमी निधी देण्याच्या कारणावरून हा वाद झाला आहे. पालक मंत्री संदीपान भुमरे हे आमदारांना निधी देत नसल्याचा आरोप करण्यात आला. 
 
छत्रपती संभाजी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक सुरु असताना पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघातील कामाच्या निधीचा मुद्दा मांडला असताना संदीपान भुमरे यांच्याकडून ठाकरे गटाच्या आमदारांच्या निधी वाटप मध्ये भेदभाव करण्याचा आरोप अंबादास दानवे यांच्या कडून करण्यात आल्यावरून बाचाबाची झाली  विरोधी पक्षातील आमदारांना निधी देण्यात येणार नाही असा आरोप केल्यानंतर पणन मंत्री अब्दुल सत्तार आणि छत्रपती संभाजी नगरचे पालक मंत्री व रोजगार हमी योजना मंत्री संदीपन भुमरे यांनी अंबादास दानवे यांचा एकेरी उल्लेख केल्यावरुन शाब्दिक बाचाबाची झाली आणि भर बैठकीत गोंधळ झाला. मात्र काही वेळा नंतर हा वाद थांबला.
 





 Edited by - Priya Dixit   
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती