'सनातन'वर बंदी घातल्या तीव्र लढा उभारू : गोखले

बुधवार, 22 ऑगस्ट 2018 (11:47 IST)
डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाशी हिंदू जनजागृती समिती  आणि सनातन संस्थेचा संबंध नाही. कोणत्याही परिस्थितीत सनातन व आमच्या संस्थेवर बंदी आणू देणार नाही, तसा प्रयत्न झाला तर तीव्र लढा उभारला जाईल, असा इशाराच हिंदू जनजागृतीसमितीचे समन्वयक पराग गोखले यांनी दिला.
 
दहशतवादीविरोधी पथक आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) काही संशयित हिंदुत्ववादी दहशतवाद्यांना अटक केली असून या अटकेच्या पार्श्वभूीवर सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. पुण्यात सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीच्यावतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले. बाजीराव रोडवरील हाराणा प्रताप उद्यान चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. बाजीराव चौक, अप्पा बळवंत चौक, शनिवारवाडा, कसबा गणपती मंदिर येथे मोर्चाचा शेवटचा टप्पा होता. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. सत्याची बाजू नेहमीच मांडू, आम्ही सारे हिंदू, अंनिस नव्हे वैज्ञानिक भोंदू, जवाब दो अंनिस असे फलक या मोर्चात दिसत होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती