केंद्र सरकारने व्हॉट्सअपसमोर ठेवल्या तीन अटी

बुधवार, 22 ऑगस्ट 2018 (09:19 IST)
व्हॉट्सअॅपला केंद्र सरकारने  व्हॉट्सअॅपला फेक मेसेज व्हायरल करणाऱ्यांना रोखण्यासाठी तांत्रिक उपाय करणे, तसेच हिंदुस्थानात कंपनीचे कार्यालय स्थापन करणे, अशा काही गोष्टींवर तातडीने काम करण्यास सांगण्यात आले आहे. व्हॉट्सअॅपचे सीईओ क्रिस डॅनियल यांची हिंदुस्थानचे माहिती आणि प्रसारण मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी मंगळवारी दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना प्रसाद म्हणाले की, ‘अफवा रोखने, पॉर्न व्हिडीओ, फोटो आणि खोटी माहिती पसरवणे या सारख्या समस्यांवर तांत्रिक उपाय शोधण्याचे व्हॉट्सअॅपला सांगितले आहे.’
 
व्हॉट्सअपसमोर ठेवण्यात आलेल्या तीन अटी
1) व्हॉट्सअॅपवरील फेक न्यूज आणि अफवा रोखण्यात याव्यात आणि यासाठी प्रभावी तांत्रिक उपाय शोधणे
2) हिंदुस्थानात काम करण्यासाठी स्थानिक कार्यालय तयार करणे
3) खोट्या बातम्या तयार करणाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तांत्रिक उपाय शोधणे आणि तक्रार निवारण करण्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती करणे 
 
प्रसाद पुढे म्हणाले की, ‘व्हॉट्सअॅपचे सीईओ क्रिस डॅनियल यांच्यासोबतची बैठक यशस्वी झाली आहे. तीन प्रमुख मुद्द्यांवर चर्चा केली. केरळ पूरग्रस्तांसाठी व्हॉट्सअॅपकडून मिळालेल्या मदतीबाबत आम्ही त्यांचे आभार मानले. व्हॉट्सअॅपवर खोटी बातमी आणि अफवा पसरवल्याने मॉब लिचिंग सारख्या, रिव्हेंज पॉर्न यासारख्या घटना घडल्या आहेत. यावर उपाय शोधण्याचे आवाहन त्यांना करण्यात आले आहे. तसेच देशात स्थानिक युनिट तयार करण्याची सूचनाही देण्यात आली आहे.’

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती