‘समीर वानखेडे भाजपचा कार्यकर्ता नाही, त्यामुळे…’, वानखेडेंवरील खंडणीच्या आरोपानंतर भाजपची सावध भूमिका

सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (08:26 IST)
मुंबईतील क्रूझ वरील ड्रग्स पार्टी प्रकरणात आर्यन खानला अटक  करण्यात आली आहे. आर्यन खान अटक प्रकरणी पंच किरण गोसावी याने शाहरुख खानकडे 25 कोटींची खंडणी  मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर भाजपही  बॅकफूटवर गेली आहे. समीर वानखेडे  हा काही भाजपचा कार्यकर्ता नाही, त्यामुळे त्याची पाठराखण करायचा विषय येत नाही, अशी सावध प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
 
पुण्यात  पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी आर्यन खान अटक प्रकरणावर  आपली प्रतिक्रिया दिली. समीर वानखेडे हा भाजपचा कार्यकर्ता नाही. त्यामुळे त्याची पाठराखण करायचा विषय येत नाही. जर या प्रकरणी काही एनसीबीवर  आरोप करण्यात आले आहे. ज्यांनी कुणी केले आहे. त्याची चौकशी व्हावी, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
 
शरद पवारांनी पुण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, यावरुन चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर  निशाणा साधला. शरद पवार हळूहळू अजित पवारांच्या  हतात असलेल्या ऑल पिंपरी-चिंचवड  आणि पुणे काढून घेत आहेत.एकाप्रकारे अजित पवार यांची ताकद कमी केली जात असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती