कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाउ खोत यांना तातडीने ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यांना पहाटे उलट्यांचा त्रास झाला आणि चक्करही आली होती, याशिवाय त्यांना मानदुखीचाही त्रास उद्भवला आहे. सदाभाऊ खोत यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.