सचिन वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात बदली, पोलिसांच्या विशेष शाखा १ ठिकाणी बदली

शुक्रवार, 12 मार्च 2021 (16:30 IST)
मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात संशयास्पद भूमिका असणारे असिस्टंट पोलीस इंस्पेक्टर सचिन वाझे यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. अखेर यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घोषणा करत सचिन वाझे यांची क्राईम ब्रँचमधून बदली केली जाणार, अशी घोषणा केली होती. दरम्यान, सचिन वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात बदली करत मुंबई पोलिसांच्या विशेष शाखा १या ठिकाणी बदली करण्यात आली आहे.
 
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणात विरोधकांनी सभागृहात दोन दिवस जोरदार गोंधळ घातला. सचिन वाझेंवर निलंबनाची कारवाई होणार नाही, तोवर विधिमंडळाचे सभागृह चालू देणार नाही, अशी भूमिका विरोधी पक्षाने घेतली होती. सचिन वाझे प्रकरणाचे पडसाद हे मंगळवारी झालेल्या अधिवेशनाच्या कामकाजातही दिसले होते. या संपूर्ण प्रकरणात अजितदादांनी सचिन वाझे यांच्या बदलीच्या कारवाईचा संपूर्ण किस्सा अधिवेशनाचे सूप वाजताना पत्रकारांना सांगितला. अधिवेशाच्या समारोपाला घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री यांनी कोणत्या परिस्थितीत सचिन वाझे यांच्या बदलीचा निर्णय घ्यावा लागला या गोष्टीचा उलघडा केला आहे. एकूणच या संपूर्ण प्रकरणात सरकारला बॅकफुकटला जाव लागल्याचीच एक प्रकारे स्पष्टोक्ती अजितदादांच्या उत्तरातून दिसून आली. दरम्यान, सचिन वाझेंची बदली करण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती